स्वाध्याय परिवाराच्या वतीने पथनाट्य सादर करुन श्रीकृष्ण जयंती साजरी

Bharari News
0
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 
        वाघाळे (ता शिरूर) येथे परमपुज्य पांडुरंगशास्ञी आठवले यांच्यां प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवा वर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा,
भगवान श्रीकृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून साजरी न करता त्याचे विचार समाज्याच्या शेवटच्या घटका पर्यंत पोहोचवण्यासाठी पथनाट्याची संकल्पना दिली. गेल्या अनेक वर्षांपासुन परमपुज्य पांडुरंगशास्ञी आठवले यांच्या कन्या सौ.धनश्री श्रीनिवास तळवळकर स्वाध्याय परिवाराची धुरा सांभाळत आहेत.त्यांच्या मार्गदर्शनानुसार लाखो युवक हे विचार घेऊन देश परदेशात जात आहेत.यंदा देशभरातील १६ राज्यासह विदेशात लाखो युवक " दिखावे की दुनिया " या पथनाट्याच्या माध्यमातुन सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त करणार आहेत. मराठी , हिंदी , तामिळ , गुजराती , तेलगू , पंजाबी , उडीया , बंगाली अशा विविध भाषांच्या माध्यमातुन ही पथनाट्य दि. १३ आँगस्ट ते २१ आँगस्ट या काळात साजरी केली जाणार आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही प्रलोभनाशिवाय आपले शिक्षण , नोकरी , व्यवसाय सांभाळून व या सर्वातून वेळ काढून हे युवक हे पथनाट्य साजर करणार आहेत. आम्हाला अस वेगळ काही करायला वेळच नसतो अस जिथ जागोजागी ऐकू त्याच वयोगटातील हे युवक आहेत.हे विशेष 
आज ब-याचदा तरुण प्रलोभनांसमोर झुकताना दिसतो.याचे मुख्य कारण म्हणजे विचारांची कमतरता.दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए.अशी परिस्थिती बहुतांश वेळा पाहायला मिळते.भगवान श्रीकृष्णाचे श्रीमद्भगवगीतेतील विचार इतके प्रभावशाली आहेत की , ते जीवनात साकार झाल्यास व्यक्ती , कुटुंब , समाज , राष्ट्र असा उत्तरोत्तर विकास शक्य आहे.माञ हे प्रभावी विचार तरुणांना मिळत नाहीत. तरुणां पर्यंत पोहोचत नाहीत. परिस्थितीला कंटाळून , प्रंसगी परिस्थितीला शरण जाऊन संकटापासुन पळताना आजचा तरुण दिसत आहे.पण कृष्णाचे विचार मिळाले तर आजचा युवान देखील आनंदान , ताठ मानेन जगू शकतो.असे काहीशे विचार या पथनाट्यातून पाहायला मिळणार आहेत.
दहीहंडी ची उंची व थर यावर बाष्कळ चर्चा व वांदग करताना आपण श्रीकृष्णाची , त्याच्या विचारांची आणी दहीहंडी उत्सवाची " उंची " किती खुजी ठरवतोय याच भानच समाजात कोणाला राहिलेल नसताना स्वाध्याय परिवाराच्या युवकाची जन्माष्टमी निमित्त साजर होणारी ही पथनाट्ये आशेचा एखादा किरण फुलवू शकतील हे नक्की.
परमपुज्य पांडुरंगशास्ञी आठवले यांच्यां प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवा वर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करतो.
   भगवान श्रीकृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून साजरी न करता त्याचे विचार समाज्याच्या शेवटच्या घटका पर्यंत पोहोचवण्यासाठी पथनाट्याची संकल्पना दिली. गेल्या अनेक वर्षांपासुन परमपुज्य पांडुरंगशास्ञी आठवले यांच्या कन्या सौ.धनश्री श्रीनिवास  तळवळकर स्वाध्याय परिवाराची धुरा सांभाळत आहेत.त्यांच्या मार्गदर्शनानुसार लाखो युवक हे विचार घेऊन देश परदेशात जात आहेत.यंदा देशभरातील १६ राज्यासह  विदेशात  लाखो युवक " दिखावे की दुनिया  " या पथनाट्याच्या माध्यमातुन सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त करणार आहेत. मराठी , हिंदी , तामिळ , गुजराती , तेलगू , पंजाबी , उडीया , बंगाली अशा विविध भाषांच्या माध्यमातुन ही पथनाट्य दि. १३ आँगस्ट ते २१ आँगस्ट या काळात साजरी केली जाणार आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही प्रलोभनाशिवाय आपले शिक्षण , नोकरी , व्यवसाय सांभाळून व या सर्वातून वेळ काढून हे  युवक हे पथनाट्य साजर करणार आहेत. आम्हाला अस वेगळ काही करायला वेळच नसतो अस जिथ जागोजागी ऐकू  त्याच वयोगटातील हे युवक आहेत.हे विशेष 
    .आज ब-याचदा तरुण प्रलोभनांसमोर झुकताना दिसतो.याचे मुख्य कारण म्हणजे विचारांची कमतरता.दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए.अशी परिस्थिती बहुतांश वेळा पाहायला मिळते.भगवान श्रीकृष्णाचे श्रीमद्भगवगीतेतील  विचार इतके प्रभावशाली आहेत की , ते जीवनात साकार झाल्यास व्यक्ती , कुटुंब , समाज , राष्ट्र असा उत्तरोत्तर विकास शक्य आहे.माञ हे प्रभावी विचार तरुणांना मिळत नाहीत. तरुणां पर्यंत पोहोचत नाहीत. परिस्थितीला कंटाळून , प्रंसगी परिस्थितीला शरण जाऊन संकटापासुन पळताना आजचा तरुण दिसत आहे.पण कृष्णाचे विचार मिळाले तर आजचा युवान देखील आनंदान , ताठ मानेन जगू शकतो.असे काहीशे विचार या पथनाट्यातून पाहायला मिळणार आहेत.
दहीहंडी ची उंची व थर यावर बाष्कळ चर्चा व वांदग करताना आपण श्रीकृष्णाची , त्याच्या विचारांची आणी दहीहंडी उत्सवाची " उंची " किती खुजी ठरवतोय याच भानच समाजात कोणाला राहिलेल नसताना स्वाध्याय परिवाराच्या युवकाची जन्माष्टमी निमित्त साजर होणारी  ही पथनाट्ये आशेचा एखादा किरण फुलवू शकतील हे नक्की.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!