हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
गुडलक चौक डेक्कन पुणे येथे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आंदोलन, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल वारंवार चुकीचे वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची केवळ माफी मागून चालणार नाही. त्यांनी महाराष्ट्र सोडावा,
अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांच्या उपस्थितीत ‘राज्यपाल छोडो’ आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करत विद्या चव्हाण यांनी महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. यावेळी शहराध्यक्षा मृणालिनी वाणी, जयदेव गायकवाड,, वैशाली नागवडे, जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, हवेली तालुका महिला अध्यक्ष सुरेखा भोरडे, सरचिटणीस ज्योती थोरात ,दीपाली धुमाळ, रुपाली ठोंबरे, कविता आल्हाट, किशोर कांबळे,यांच्यासह माजी आमदार उपस्थित होते. या आंदोलनात महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.