हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
वाघोली (तालुका हवेली) येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधत वाघोलीत माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना कटके यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कावड यात्रेदरम्यान वाघेश्वर मंदिरात महिलांनी पिंडीवर जलाभिषेक केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन या कावड यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी पारंपारिक वाद्यांचा जयघोष, ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करत सदर कावड यात्रेमध्ये उपस्थित असणाऱ्या महिलांनी प्रदक्षिणा पूर्ण करून वाघेश्वर मंदिरामध्ये भगवान शंकराच्या पिंडी वर मंत्रोच्चार करत जलाभिषेक केला. उपस्थित सर्व महिला शिवभक्तांनी शिव दर्शनाचा देखील लाभ घेतला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना कटके, नलिनी गाडे, छाया कटके,ज्योती थोरात वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री सातव तसेच वाघोली परिसरातील लोकप्रतिनिधी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.