लोणी काळभोर अनिकेत मुळीक
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून गावामध्ये ग्रामपंचायतला खूप महत्त्व आहे, बरेचसे महत्त्वाचे निर्णय ग्रामसभेमध्ये घेतले जातात त्यासाठी गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आलेल्या ग्रामसभेचे अधिकार व नियम माहिती असणे गरजेचे आहे, ROI(माहिती अधिकार २००५ (अ) ग्रामसभेचे नियम असे आहेत,
१).ग्रामसभेची सूचना नियमानुसार ७ दिवस अगोदर ग्रामस्थांना वेगवेगळ्या माध्यमाचा जसे बॅनर, गावदवंडी वापर करून देणे बंधनकारक आहे.
२). ग्रामसभेच्या 3 दिवस अगोदर ग्रामस्थ अर्ज सादर करून प्रश्न मांडू शकतात किंवा एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी अर्ज सादर करू शकतात.
३). ग्रामपंचायतला महिलांची विशेष ग्रामसभा घेणे बंधनकारक असते.
४).ग्रामपंचायत मधील प्रत्येक वार्डातील सदस्यांना त्या त्या वार्डात ग्रामसभे अगोदर वार्डातील नागरिकांची सभा घेणे बंधनकारक असते.
५).ग्रामपंचायत ने जर ग्रामसभेचे नियम पाळले नाही तर ग्रामसेवक,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत कारवाई देखील होऊ शकते.
६).ग्रामसभेत गावाच्या विकासावर व विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेत सहभाग घेतला पाहिजे. वरील महत्वाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा आणि समाजात जागरूकता पसरवा ही नम्र विनंती....
*गाव जागा झाला तर देश जागा होईल,
अन्यथा गाव, तालुका भ्रष्टाचाराने बरबटले आहेत आणि आपण राज्यावर, देशावर बोलतोय!*