अवैद्य दारुधंदे बंद करा, कोडीत ग्रामस्थांची जिल्हा अधिकारी यांच्यासह, प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी,
दारुबंदी साठी सोमवारी कोडीत बु" येथे ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण,
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
कोडीत बु" व कोडीत खुर्द, येथे , खुलेआम व बेकायदेशीरपणे सुरु असलेले अवैध दारूधंदे कायमस्वरूपी बंद करा, अशी मागणी, कोडीत बु" ग्रामपंचायत व कोडीत खुर्द ग्रामपंचायत व दोन्ही गावातील ग्रामस्थांनी , प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे,
शुक्रवार दि. १९ / ८ / २०२२ रोजी याबाबतचे लेखी निवेदन, कोडीत बु" व कोडीत खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने, व ग्रामस्थांच्या वतीने, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे जिल्हा अभिनव देशमुख उपविभागीय अधिकारी तथा पुरंधर - दौंडचे प्रांत प्रमोद गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पुरंदरच्या तहसिलदार रुपाली सरनोबत, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, व उत्पादन शुल्क विभाग पुरंदर यांना देण्यात आले आहे,
प्रशासकीय अधिकारी यांना निवेदनात म्हटले आहे की, मौजे कोडीत खुर्द व कोडीत बु" ग्रामपंचायतीच्या वतीने, गावातील अवैद्यरित्या सुरु असलेले दारुधंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, याबाबत अनेकवेळा, ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने सासवड पोलीस स्टेशनला लेखी निवेदन दिलेली आहेत . ग्रामस्थ व महिलांनी मोर्चाचे नियोजन देखील केले होते. परंतु, आजतागायत सासवड पोलीस स्टेशनच्या वतीने, कोडीत गावातील अवैद्यरित्या सुरु असलेले दारुधंदे कायमस्वरूपी बंद करणेबाबत , ठोस उपाययोजना करण्यात आली नाही, त्यामुळे, दारुवाले तुपाशी व ग्रामस्थ उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली असून, दारुमुळे अनेक कुटूंबे उध्वस्त झाली आहेत, अनेक तरुण मुले व्यसनाधीन होत आहेत, तरं अनेक तरुण मुलांना लग्नापूर्वीचं मरण पत्कारावे लागले आहे, त्यामुळे, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात कोडीत ग्रामस्थांनी गावातील अवैद्यरित्या सुरु असलेले, दारुधंदे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या अनुषंगाने उद्या सोमवार दि. २२ / ८ / २०२२ रोजी सकाळी ठिक १० - ०० वाजता कोडीत बु" व कोडीत खुर्द ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने, श्रीनाथ भैरवनाथ मंदीरासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, या दिवशी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब,भोर विभाग सासवड व मा. पोलीस निरीक्षक साहेब सासवड पोलीस स्टेशन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन, सदर दारुधंदे तात्काळ बंद करण्यात येतील , याबाबत ग्रामस्थांना लेखी आश्वासन देण्यात यावे, अन्यथा, कोडीत ग्रामस्थांच्या वतीने, मा उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या कार्यालयासमोर जाहीर उपोषण करण्यात येणार आहे असा इशारा देण्यात प्रशासकीय अधिकारी यांना दिलेला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .