शेल पिंपळगाव प्रतिनिधी बापू गाडे पाटील
निमगाव दावडी (तालुका खेड) येथे आज चासकमान चा डावा कालवा फुटला, मोठे भगदाड पडल्याने, पाण्याच्या वेगामुळे शेत जमिनीचे नुकसान,
संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजूबाजूने शेती क्षेत्र असून, ऊस
तसेच तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, कालवा फुटल्याने व
कालव्याला मोठे भगदाड पडल्याने अतिरिक्त पाण्याला सर्व बागायती
क्षेत्रामधून मार्ग मिळाल्याने शेतीमध्ये खड्डे पडलेले आहेत सपाट शेतीचे
नुकसान झाले असून, पिकांचे देखील नुकसान झाली आहे,
या महिन्यातील ही दुसरी घटना असून, यापूर्वी मांजरेवाडी येथे चासकमान चा डावा कालवा फुटला होता, पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे, सतर्क राहण्याची गरज आहे, अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून उपाययोजना करण्याची गरज आहे, पाण्याच्या प्रवाहामुळे निमगाव खंडोबा व दावडी कडे जाणाऱ्या संलग्न राजगुरुनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुल पाण्याखाली गेल्याने काही तास वाहतूक ठप्प झाली होती,