शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्था शिरूर व शिक्रापूर येथील श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी निमित्त विद्यालयाच्या प्रांगणात सर्पविषयक जनजागृती करण्यात आली.
शिक्रापूर (ता.शिरुर) येथील श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कुलमध्ये आयोजित या कार्यक्रमात वन्य पशु पक्षी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भाडळे, सचिव शेरखान शेख, सदस्य अमोल कुसळकर, बाबासाहेब मोरे यांनी मार्गदर्शन केले. नागपंचमीच्या निमित्ताने सर्पमित्रांनी विद्यार्थ्यांच्या शंका व अडचणींचे निराकरण केले.यावेळी सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सोमनाथ सायकर, संस्थेच्या अध्यक्षा मनिषा सायकर, विश्वस्त बाबुराव साकोरे, अक्षय गायकवाड, विद्यालयाचे प्राचार्य गौरव खुटाळ, उपप्राचार्या उज्ज्वला दौंडकर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बाबुराव साकोरे यांनी आभार मानले.