लोणीकाळभोर अनिकेत मुळीक
कदम वस्ती ग्रामपंचायत स्थापना 1963 साली झाली. लोणी काळभोर या गावातून कदम वस्ती ग्रामपंचायत वेगळी करण्यात आली 1965 साली आपल्या गावचे त्यावेळेसचे सरपंच श्री गणपत (बापू)काळभोर यांनी कदम वस्ती गावचा भविष्यकालीन विचार करून डी.पी प्लॅन विकास आराखडा तयार करून गावचा विकास मार्ग तयार केला होता.
कदम वाकवस्ती गावची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने तसेच गावातील पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर त्या योजनेच्या देखभालीचा खर्च अंदाजे १ कोटी २५ लाख रुपयांचा आहे.
कदम वस्ती ग्रामपंचायत एकूण संपूर्ण वार्षिक खर्च अंदाजे ६ कोटी 25 लाख रुपये आहे. यामध्ये आपल्या ग्रामपंचायतचे उत्पन्न ५.६५ कोटी जमा होणारा कर ६० % वसुली ३.४५ कोटी म्हणजेच खर्चाचे प्रमाण उत्पन्नाच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च असल्याने येणाऱ्या काळात ग्रामपंचायत चालवणे अशक्य होईल या सर्व गोष्टीचा अभ्यास करून आज नगरपंचायत व्हावी असे एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला वाटतं
गौरी चित्तरंजन गायकवाड लोकनियुक्त सरपंच.चित्तरंजन गायकवाड यांनी सर्वसामान्य माणसांना पडणाऱ्या शंकेचे निवारण केले. नगरपंचायतीतून होणारे फायदे त्यांच्या आपणास कसा लाभ होईल याचे मार्गदर्शन केले. तसेच गावातील सरपंच सदस्य गावातील लोकांमुळेच असतात त्यांची सेवा करणे हे प्रथम कर्तव्य आहे. असे ते यावेळी बोलले व कार्यक्रमांमध्ये आलेल्या अनेक वृद्ध तरुण महिलावर्ग अशा सर्वांचे नक्की काय मत आहे हे देखील स्वतः माईक देऊन त्यांनी विचारले.-
*चित्तरंजन गायकवाड लोकप्रतिनिधी*
*नवीन नगरपंचायत स्थापन झाल्याने त्याचे अनुषंगिक फायदे पुढीलप्रमाणे*
*१) निधी वाढ* - सदर गावचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यास शासनाच्या खालील योजना द्वारे मोठ्या प्रमाणात निधी विकासासाठी उपलब्ध होईल..
१) वैशिष्ट्यपूर्ण योजना
२) रस्ता अनुदान
३) नवीन नगरपंचायत अनुदान
४) विशेष रस्ता अनुदान
५) विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना
६) यात्रा स्थळ अनुदान
७) वित्त आयोग
८) अल्पसंख्यांक योजना
*२) कर रचना:-* सर्वांच्या मनात प्रस्तावित नगरपंचायतीमुळे होणाऱ्या कर वाढबाबत अनेक शंका आहेत. मात्र याबद्दल या ठिकाणी एक बाब महत्त्वाची आहे. की ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत अथवा नगर परिषदेत झाल्यावर प्रथम ४ वर्षे कोणत्याही प्रकारची कर वाढ होत नाही. नवीन नगरपंचायत स्थापनेनंतर सर्व प्रक्रिया होऊन नवीन कर रचना येण्यासाठी किमान ५ वर्षापेक्षा अधिक कालावधी जावा लागण्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर होणाऱ्या नवीन कर आकारणी मुळे गावाचे उत्पन्न वाढून शेवटी नागरिकांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी त्याचा वापर होणार आहे. आपल्या गावात आपण नागरिकांच्या हितासाठी घरासाठी सवलतीचा दर ठेवून एच.पी, एमआयटी, विशे कंपनी अशा व्यावसायिक अस्थापना यांना चढा दर लावून शहराच्या उत्पन्नात थोडी भर टाकू शकतो..
*३) नागरिकांना सुविधा*
१) नगरपंचायत स्थापन झाल्यावर सर्व कागदपत्रांचे डिजिटल डिजिटलायझेशन करून नागरिकांना जन्म- मृत्यू थकबाकी घर पावती असे अनेक प्रकारचे दाखले नागरिकांना तात्काळ आणि ऑनलाईन उपलब्ध होऊ शकतील.
*या साठी आपल्याला पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर अवलंबून राहावे लागणार नाही.*