शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिरुर पंचायत समिती (शिक्षण) विभागातर्फे बाल चित्रकला स्पर्धा भांबर्डे (ता.) शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली.
वयोगट ७ वर्षापर्यंत गट पहिला, वयोगट ७ ते ९ वर्षापर्यंत दुसरा, वयोगट ९ ते १२ वर्षापर्यंत तिसरा आणि वयोगट १२ ते १६ वर्षापर्यंत चौथा असे एकूण चार गटात स्पर्धांचे आयोजन शिरूर तालुक्यात करण्यात आल्याची केंद्रप्रमुख सुनील जोशी यांनी सांगितले.
भांबर्डे येथील विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी १२ ते १६ वर्ष वयोगटात सहभाग नोंदविला. या वयोगटातील विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिर, फुटबॉल खेळणारे खेळाडू, चहाची टपरी या विषयावर सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने छान चित्रे काढल्याचे मुख्याध्यापक मारुती कदम यांनी सांगितले. प्रथम पाच क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त स्पर्धक पुढीलप्रमाणे :- प्रथम - गौरव मांढरे (इ. १०वी), द्वितीय - भाग्यश्री पवार (इ. ९वी), तृतीय - आदित्य गायकवाड (इ.८वी), चतुर्थ - सुरेश वीर (इ.८वी), पाचवा - राजवर्धन पवार (इ.९वी), कोविड -१९ मुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना शाळेत वाव मिळाला नाही म्हणून या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलेचा विकास होईल असे मत मारुती कदम यांनी व्यक्त केले. या स्पर्धेचे आयोजन कलाशिक्षक बाळासाहेब दिवेकर आणि सुरेश शेळके यांनी केले.