कामगारांचे येणे व ग्रामपंचायतीच्या करासाठी इस्पात कंपनीगेट बंद आंदोलन - रामदास दरेकर

Bharari News
0
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
       कामगारांचे हिशेब येणे व ग्रामपंचायतीचे ६ कोटीवर थकीत कर वसुलीसाठी कामगारांसह सणसवाडी ग्रामस्थ इस्पात कंपनी गेटवर आंदोलन करूया , असा इशारा सणसवाडी ग्रामपंचायतचे रामदास दरेकर व सरपंच संगिता हरगुडे यांनी कंपनी गेटवर कामगार व ग्रामस्थांचे बैठकीत दिला,
कामगारांना लाखा दरम्यान हिशेब देवून बोळवू पहाणाऱ्या व ग्रामपंचायतीच्या ६ कोटीवर थकीत करा ऐवजी ११ हजार टिकवू पहाणाऱ्या इस्पात कंपनीला व ती कवडीमोल भावात खरेदी करणाऱ्या युरेनस सॉफ्टेक पार्क या खाजगी कंपनीचे जुनी देणी आधी देणे कर्तव्य होते पण त्यांनी चालाखी दावत कंपनीतून मटेरीयल बाहेर काढत आहेत . बाकी कुणालाही नवीन कंपनी उभारणीस परवानगी तर देणार नाहीच पण गेटवर आंदोलन करून गावचा टॅक्स वसूल करू असा इशारा रामदास दरेकर यांनी दिला आहे .
सध्या ४० कामगार लावून शिक्रापुरचे बाळासो नर्के गॅस एजन्सीकडून १० मोठेगॅस सिलेंडर व १५ ऑक्सीजन सिलेंडर लोखंड व शेड कटींगसाठी वापरत असून सामान हलवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे . खरेतर चोरी गेलेल्या भंगारातून कंपनीला दहा वेळा कामगारांचा हिशेब व ग्राम पंचायतीचा टॅक्स देता आला असता व आताचे भंगारातूनही देता येईल . तरी खरेदीदार युरेनस पार्कने याचा विचार करून तो गोडीने द्यावा , अन्यथा गेट बंद आंदोलन करावे लागेल असा इशाराही रामदास दरेकर यांनी दिला .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!