सणसवाडी येथील इस्पात कंपनीने कामगारांना व ग्रामपंचायतीला, बावीस वर्षे फसवले - हिशोब न दिल्यास गेट बंद आंदोलनाचा इशारा

Bharari News
0

सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 

           सणसवाडी ता . शिरूर येथील २२ वर्षापुर्वी टाळेबंदी करून ५ हजार कामगारांचे भवितव्य धुळीला मिळवणाऱ्या इस्पात कंपनीचे व्यवहारांची चौकशी करून पिडीत कामगारांना न्याय मिळावा , अशी मागणीचे निवेदन कंपनी गेटवर राष्ट्वादी श्रमशक्ती महासंघ आयोजीत बैठकीत सरचिटणीस दिलीप देशमुख यांनी शिक्रापुर पो. स्टेशनचे पो. निरीक्षक आतकरी , पो ना . कारंडे, रासकर ,शिवणकर यांना दिले .           

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सदर निवेदन पाठविणेत आले असून इस्पात खरेदीदार कंपनी युरेनस सॉफ्टेक पार्क प्रा .लि चे प्रतिनिधींनी गेटवर येवून निवेदन स्विकारले नाही . सणसवाडीच्या सरपंच संगिता हरगुडे , रामदास दरेकर यांनाही इस्पातचे कामगारांनी निवेदन दिले .न्यायालयीन लढ्यात सुप्रिम कोर्टापर्यंतचे सर्व निकाल कामगारांचे बाजूने लागले . २०१५ ला कामगारांना ६कोटी देणेचा प्रस्ताव होता . पण पुढे कंपनीने दिवाळखोरी जाहीर करत ४ कोटीही दिले नाहीत . व कंपनीची विक्री २०० कोटीं ऐवजी १०४ दावली . त्यातच लाखाचे दरम्यान काही कामगारांना त्यांचे खातेवर बेकायदेशिररित्या पाठवून हिशेब देण्याचा देखावा केला , तो कामगारांना मान्य नाही .
कलकता स्थित NCLT कोर्टालाही कं . मैनेजमेंटने चुकीची  माहीती दिल्याने कामगारांचे भविष्याचा विचार न करता विरोधी निकाल दिलेने आता कामगारांनी न्यायालयीन लढा व गेटवर आंदोलनाचा मार्ग स्विकारला असुन पोलिस प्रशासनाला सहकार्या साठी निवेदन दिले आहे . 
यावेळी सुर्यकांत लोणकर, सरपंच संगिता हरगुडे , रामदासनाना दरेकर , पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले व कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाचे अन्याय धोरणाचा निषेध करत कामगारांचा हिशेब व ग्रामपंचायतीचा थकीत कर वसुली साठी गेटबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला .
यावेळी सचिन भंडारे ,  विक्रम दरेकर, प्रविण दरेकर , उद्योजक नवनाथ हरगुडे , नवनाथ दरेकर , सोसायटीचे संचालक भैरु दरेकर , सुदाम यादव , महासंघाचे अध्यक्ष रामा वांद्रे , चिटणिस दिलीप देशमुख, प्रकाश पाटील , विजय रणधिर , भगवान सरक , अशोक देवरे , दता म्हस्के , दिलीप म्हस्के, शरद म्हस्के , अण्णा श्री खंडे, संजय विर , नरहरी काळदाते , राजू स्वामी , विजय निंबाळकर , विद्याधर कुंटे, भागवत जगदाळे, विलास पाटील, हेमंत राठोड , शिवाजी साळुंके, भगवान सपकाळ , नामदेव महाजन आदी शंभरावर कामगार व ग्रामस्थ उपस्थीत होते
आज पावेतो ५ हजारापैकी शंभरावर कामगारांचा हालाखी वा उपास मारीने मृत्यु झाला आहे . कामगारांचे परीवाराचे व मुलबाळांचे अतोनात हाल झाले आहेत . तरी आतातरी न्याय मिळावा अशी आशा व अपेक्षा आहे .
ग्रामपंचायतचा एवढा मोठा कराचा तोटा होणे हे गावच्या विकासासाठी बाधक आहे त्यामुळे  सनदशीर मार्गाने जाऊन थकितकर मिळण्यासाठी प्रयत्न करणार.
संगीता हरगुडे, सरपंच सनसवाडी
सणसवाडी ग्रामपंचायतची जवळपास 7 कोटी 52 लाख 77 हजार 922 येणे बाकी आहे तरी एनसीएलटी कोर्टाच्या कडून दिवाळखोरीचे कारण देत अकरा हजार रुपये भरून कर पूर्ण करण्यास सांगितले आहे, तरी ग्रामपंचायतीची एवढा मोठा कराचा तोटा सहन करणार नाही ,याबाबत कायदेशीर मार्गाने जात पुन्हा एकदा याचिका दाखल करत ग्रामपंचायतीचा कर मिळवण्यासाठी  ग्रामपंचायत व  ग्रामस्थ प्रयत्न करणार आहे ,
सामाजिक कार्यकर्ते, रामदास  नाना दरेकर,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!