सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
दिवे (तालुका पुरंदर) ग्रामस्थांनी शेकडो वर्षांपासूनची परंपरा जपत वनभोजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले,
पहाटे ग्रामदैवत श्री कातोबानाथ मंदिरात पुजारी स्वप्निल दिवेकर व दिगंबर दिवेकर विजय दिवेकर यांनी आकर्षक महापूजा केल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले दिवसभर ग्रामस्थांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती दुपारी दोन वाजता माळावर जाण्यासाठी पालखीचे प्रस्थान ठेवले होते यावेळी ग्रामस्थांनी ढोलाच्या ठेक्यावर गुलालाची मुक्तपणे उधळण करत गजनृत्य सादर केले यावर्षी पालखीचा मान समस्त झेंडे मंडळ ब्राम्हणकिकडे होता महिलांनी पालखीच्या खांदेकऱ्यांना मानाचे हेल घालण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती लहान मुलांचा ओलांडा झाल्यावर टिळेकर आळिवरून पालखी माळावर पोहोचली यावेळी महिलांनी आकर्षक रांगोळी काढत पालखीचे स्वागत केले
दिवे गावच्या वनभोजनाला एक वेगळे महत्त्व आहे ग्रामस्थ नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी असले तरी वनभोजनाला आवर्जून येत असतात माळावर बारा वाड्या व दिवे गावातील भावीकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती नंतर युवकांमध्ये अ व ब असे संघ तयार करण्यात आले व कबड्डी खेळण्यात आली यावेळी युवकांनी आपले वय विसरत कबड्डीचा मनमुराद आनंद लुटला यात ब संघाने अ संघावर मात करत विजय मिळवला पालखी समोर ह.भ.प.गितांजली महाराज झेंडे यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले गावातील भजनी मंडळाने त्यांना साथ दिली यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते बालगोपाळांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला काही मुलांनी आकर्षक वावड्या तयार केलेल्या होत्या संध्याकाळी पालखीची जालींदरनाथ महाराज मंदिरात भेट झाली व पालखी गावच्या वेशीवर विसावली व रात्री पुन्हा वाजत गाजत पालखी मंदिरात नेण्यात आली व उत्सवाची सांगता झाली यावेळी ग्रामस्थांसह पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उसपस्थित होती