आंबेगाव प्रमिला टेमगिरे.
स्वातंत्र्याच्याअमृत महोत्सवी वर्षानिमित्त लीला पूनावाला फाउंडेशनच्या वतीने मुलींना शिष्यवृत्ती वाटप.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनाचे औचित्य साधून आज लीला पुनावाला फौंडेशन च्या वतीने आतापर्यंत १२ हजार ५०० मुलींना शिष्यवृत्ती वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याआधी लीला फौंडेशनच्या वतीने 12हजार 500 मुलींना आत्तापर्यंत शिष्यवृत्ती देण्यात आली , यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिनव कुंभार आयकर आयुक्त पुणे विभाग , अमित तलरेजा ब्रास इंडिया ऑटोमोटीव्ह लिमिटेड , फिरोज पुनावाला , पद्मश्री लीला पुनावाला यांच्या उपस्थितीत यावेळी ,,टू गेट टू मारो ,अंकाचे प्रकाशन करण्यात आले , या अंकात आतापर्यंत या फौंडेशनच्या माध्यमातून अनेक मुलींना आपल्या जीवनात झालेले फायदे नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले ,लीला पुनावाला मॅडम यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले याप्रसंगी पालकांना मार्गदर्शन करताना आपल्या मनोगतात सांगितले की पालकांनी मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे मुलींना शिकवण्यासाठी आपण पालक सहकार्य करणे अपेक्षित आहे मुलींनी देखील खूप अभ्यास करून उच्च ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ,मुलीसाठी शिष्यवृत्ती मिळते त्याच बरोबर अनेक मार्गदर्शक उपक्रमात सहभागी व्हावे व गणित इंग्रजी विज्ञान करिअर मार्गदर्शन व सर्व प्रकारची मदत दिली जाते याचा पालकांनी व मुलींनी फायदा घ्यावा, भविष्यात आपण आपल्या शैक्षणिक जीवनात मेहनत करून मोठ्या हुद्द्यावर नोकरी व्यवसाय करावा हिच अपेक्षा पालकांच्या प्रमाणे आमची देखील आहे , तसेच आपल्या मार्गदर्शनात फिरोज पुनावाला यांनी फौंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रमांची माहिती दिली हा कार्यक्रम पुणे येथील सिंबॉईसीस कॉन्फरन्स हॉल मध्ये पार पडला.