सुनील भंडारे पाटील
वाजेवाडी (तालुका शिरूर) येथील विद्युत खांबावरील विद्युत तारा सतत तुटत असल्यामुळे व त्याखाली ओपन जिम असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. याबाबत ग्रामस्थांकडून माहिती मिळताच कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी संबंधित महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. व तात्काळ तारांच्या जागी एअरबंच केबल टाकण्याच्या सूचना केल्या.
वाजेवाडी गावामध्ये संबंधित ठिकाणी ओपन जिम असल्यामुळे गावांमधील तरुणांची सकाळ-संध्याकाळ व्यायामासाठी या ठिकाणी दाट गर्दी असते, नेमके याच ठिकाणी वरच्या बाजूने विद्युत वाहत तारा गेल्याने, आणि संबंधित तारा तुटण्याचे घटना सारख्या घडत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते, विद्युत पुरवठा चालू असताना अनेकदा तारा तुटल्यामुळे, ओपन जिम मध्ये व्यायाम करताना, तरुणांना व मुलांना तार तुटते की काय असा भास व्हायचा,
गावातील काही ज्येष्ठ व्यक्तींनी ही बाब शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या लक्षात आणून दिली, त्यानंतर आमदार पवार यांनी लागलीच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यानुसार प्रशासनाने प्राधान्याने कारवाई करत एअरबंच केबल बसवल्या. कार्यसम्राट आमदार साहेबांच्या कार्यतत्परतेमुळे संभाव्य धोका टळला याबाबत वाजेवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. आमदार पवार व महावितरण अधिकारी यांचे आभार मानले,