शिरूर विशेष प्रतिनिधी
शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्र भागातील गणेश मंडळ यांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांची पोलिसांनी मीटिंग घेऊन त्यांना आगामी सुरू होणाऱ्या गणेश उत्सवा बाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
गणेश उत्सव साठी मंडप टाकताना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे व देखावे बसविताना समाज प्रबोधन होईल याप्रमाणे देखावे असावे. गणेश मूर्तीच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवक २४ तास नेमावे. गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून समाज उपयोगी उपक्रम राबवावे . मिरवणुकी दरम्यान डीजे ,डॉल्बी चा वापर न करता पारंपारिक वाद्याचा वापर करावा व कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा प्रकारच्या सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत.सदर मिटिंग वेळी टाकळी हाजी परिसरातील १२ गणेश मंडळ चेअध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.