सुनील भंडारे पाटील
वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील माहेर संस्थे च्या वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रभात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले, या अमृत महोत्सवाची जनजागृती, देशाविषयीचे प्रेम, तिरंग्यावरील प्रेम, या रॅलीच्या माध्यमातून माहेर संस्थेमधील, सर्व मुले, महिला, सेवक वर्ग यांनी यावेळी व्यक्त केले, सदर रॅलीमध्ये बालगोपाळ महिला पुरुष कर्मचारी सर्व उपस्थित होते. रॅलीदरम्यान सर्वांनी भारत माता की जय,स्वातंत्र्य दिनाचा विजय असो अशा अनेक घोषणा दिल्या, तसेच सर्वांच्या हातात भारतीय ध्वज होता.
सदर रॅली वढू बुद्रुक या पूर्ण गावांमधे संपन्न झाली. या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी रॅलीमध्ये ग्रामस्थांनी देखील सहभाग घेतला होता, रॅलीदरम्यान धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.सदर रॅलीमध्ये संस्थेच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.