हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
अच्छे दिन आयेंगे म्हणत आठ वर्षांपूर्वी भारत देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा आपल्या हातात घेतली त्यानंतर गॅस पेट्रोल डिझेल खाद्यतेल यांचे भाव जवळपास दुपटीने वाढले आहेत आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपा प्रणित सरकार असूनही महागाईवर नियंत्रण ठेवण्यास सरकारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे या प्रचंड महागाईच्या काळात जगावे तरी कसे हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांपुढे आ वासून उभा आहे.
याचा निषेध म्हणून महागाईची प्रतीकात्मक राखी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे देशातील भगिनींना महागाई मुक्त करावे हीच आम्ही रक्षाबंधनची ओवाळणी समजू अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि शासकीय योजना सेलच्या वतीने करण्यात आली आहे महिला अध्यक्ष मृणालिनी वाणी विधानसभा मतदारसंघ शासकीय योजना सेल अध्यक्ष ज्योती बाळकृष्ण पाचारणे, वेणू शिंदे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख व अनेक पदाधिकारी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते,