सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
सासवड(ता.पुरंदर ) येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर बरसणाऱ्या
हलक्या रिमझिम पावसात जणू गोविंद पथकांनी व कृष्ण भक्तांनी कार्यकत्यांनी
विविध गाण्यांच्या तालावर दहीहंडी निमित्त ठेका धरला होता. कोरोनाचे
निर्बंध हटल्याने यंदा सर्वत्रच दहीहंडी उत्सवात उत्साह होता. गोविंदा रे
गोपाला, लाल लाल पागोटे गुलाबी शेला... आदी गीतांवर ठेका धरत... गोविंदा
पथकांचे थर रचले जात होते. आकर्षक रोषणाई, वाद्यांचा व गाण्यांचा जणू
तरुणाईने आनंद लुटला.
![]()
![]()
पुरंदर तालुक्यात सुपे खुर्द या गावातील एकमेव असे रुद्रप्रताप गोविंदा पथक असून सासवड येथे
या पथकाने जय हनुमान मंडळ चांदणी चौक ,राधे कृष्ण दही हंडी जेजुरी नाका ,गोकुळ दही हंडी पालखी मैदान या ठिकाणच्या दहीहंडी फोडल्या..यासाठी
सुपे खुर्द या गावातील सर्व युवा वर्गाचा या गोविंदा पथकामध्ये समावेश
होता.रुद्रप्रताप या गोविंदा संघाचे नेतृत्व
डॉ.सुभाष शिवतारे ,अमोल
जगताप,अक्षय बांदल,आशिष जगताप ,राहुल शिवतारे,सुरज बांदल,राहुल चव्हाण
यांनी केले.याच बरोबर गावातील युवा गोविंद अभिषेक समगीर,साहिल
जगताप,प्रशांत खळदकर,विकास यादव ,रोहन जगताप,अविनाश गोगावले,शुभम जगताप
,ओंकार जगताप ,हाणू जगताप,जय जगताप,सुजित पवार ,सौरभ जगताप,अशा ४० ते ४५
गोविंदानी सहा थर रचून सासवड येथील दहीहंडी फोडण्यात यश मिळविले.