अनिकेत मुळीक लोणी काळभोर
कामशेत येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, अनेक ठिकाणी चोरट्या मार्गाने खुलेआम बेकायदा दारूविक्री, मटका जुगार पाकीटमारी भुरट्या चोर्या सुरू आहेत. या विरोधात आमदार सुनील शेळके यांचे आंदोलन,
त्यामुळे परिसरातील महिलांना, विद्यार्थ्यांना व नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावालागतो. त्यावेळी शेकडोच्या संख्येने नागरिक कामशेत पोलीस ठाण्याच्या समोर जमा झाले होते. यावेळी धडक मोर्चा काढत त्यांनी कामशेत पोलिसांना इशारा दिला. पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अवैध दारूमुळे तरुण पिढीचं आयुष्य उद्धवस्त होत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच, सकाळी उठून व्यायाम करण्याऐवजी तरुण पिढी दारू कुठे मिळते हे शोधत आहे आणि ही वेळ आणण्याच काम पुणे ग्रामीण पोलिसांनी केल्याचा आरोप त्यांनी केला आणि जमिनीचे प्रकरणं देखील पोलिसांच्या जीवावर होत आहेत असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एका तासाच्या आत अवैध दारू व्यवसायावर कारवाई करू असे आश्वासन कामशेत पोलिसांनी आमदार शेळके यांना नागरिकांच्या समोर दिलं. यावेळी आमदार आणि पोलीस समोरासमोर आले होते. तसेच, कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असं काही आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्या, आम्ही कारवाई करू असे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केलं.