हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
राज्य सरकारने . दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय विभाग सुरू करावे या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार अंपग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालया समोर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांचे नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात कामगार नेते डॉ बाबा आढाव यांनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला.केवळ अपंगांना दिव्यांग म्हणून त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत तर दिव्यांगांचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन करायचे असेल तर मंत्रालयात दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग झाला पाहिजे , अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि हमाल पंचायत चे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांनी केली. यावेळी पुणे जिल्हातील तसेच पिंपरी चिंचवड शहरातील प्रहार अपंग संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2000 साली दिव्यांगांसाठी स्वतंत्र आयुक्तालय केले पण त्याचा मुख्य कारभार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे ठेवला त्यामुळे प्रत्यक्ष पुनर्वसन झालेच नाही फक्त कागदावरच दिव्यांगांचे कल्याण झाले आहे या आंदोलनात धर्मेंद्र सातव महेंद्र निंबाळकर, बाबा जगताप ,दत्तात्रय भोसले ,अनिता कदम ,बाबा पाडूळे ,आनंद गायकवाड, सुनंदा बाम्हने, शरद जाधव, जीवन टोपे , मृत्युंजय सावंत, सुप्रिया लोखंडे, दत्ता तरटे, फिरोज पठाण,सुरेश जगताप, दिपाली वाघमोडे, दिलीप भोसले.सुरेश पाटील.बाळासाहेब काळभोर नंदू कोळेकर.संजय चव्हाण बापू कुडले.नंदू राऊत तसेच अंध अपंग संघटनेचे दादा आल्हाट. आलिया तिरदाज. हक्क समितीचे हरिदास शिंदे याप्रसंगी उपस्थित होते