हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
कोकणस्थ कुंभार समाज विकास संस्था पुणे समाजाच्या वतीने स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षी धुमधडाक्यात साजराकेला "विशेष गुणवंत विद्यार्थी" गुणगौरव सभारंभा सोबत कौटुंबिक मेळावा व मान्यवर पुरस्कार वितरण महासोहळा,
कोकणस्थ कुंभार समाज विकास संस्था पुणे यांनी पुणे कुंभार समाजाचा महासोहळा 2022 चे ऑफलाईन व ऑनलाईन फेसबुक च्या माध्यमातून दिमाखात आयोजन केले. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष कोकणरत्न श्री चंद्रकांतजी चिवेलकर ( साळवी) यांच्या प्रेरणेने समस्त समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्रित जमले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री विश्वजित अशोक शिरकर तर कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती महापौर . मुरलीधर मोहोळ , मा. नगरसेवक रघुनाथजी गौडा ,मा. नगरसेवक अशोकभाऊ हरणावळ व पत्रकार सुभाष जाधव व आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती त गुणवंत विद्यार्थी, उद्योजक, समाजसेवक, यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.अनेक मनोरंजन पर कार्यक्रम झाले या मध्ये जय हनुमान नवतरुण मंडळ कोळकेवाडी (कुंभारवाडी) चिपळूण यांचे सोबत शिवशाहीर गुरुराज कुंभार यांच्या गायकीतून कोकणातील आकर्षण असणारे जाकडी नृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढविली विद्यार्थ्यांना विशेष गुणवंत विद्यार्थी पुरस्कार मिळविलेल्या समाजासाठी झटणाऱ्या व आपल्यातील कलागुणांची जनमाणसात विशेष छाप सोडणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या मध्ये गजाननदादा बागावडे यांना "समाज रत्न" पुरस्काराने सन्माननीय श्री दिपकजी निवळकर ( कात्रोळी ) चिपळूण यांना "समाजभूषण" पुरस्काराने तर "कुंभार कलागौरव" पुरस्कारा साठी कुंभार सुप्रसिद्ध गायिका सुरेखाताई सूरेश साळवी व प्रकाशजी गणपत साळवी ,जालगाव ( दापोली ) यांचा यथोचित पुरस्काराने गौरविण्यात आले त्याच बरोबर अनेक आदरणीय मान्यवरांना यशस्वी उद्योजक पुरस्कार , समाजगौरव पुरस्कार , गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, उत्कृष्ट कथ्थक नृत्यांगना पुरस्कार इत्यादींचे सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरवविण्यात आले समस्त समाज बांधवांचे व निमंत्रितांचे स्वागत समाजाचे संघटक संतोष साळवी (चिवेलकर) यांनी केले तर प्रस्तावना वाचन ची जबाबदारी महीला संघटक वैशालीताई मंडळ ( अंबीरकर ) यांनी पारपाडली सूत्रसंचालनाची जबाबदारी जोस्तनाताई सागर साळवी , कु. प्रगती साळवी, कु. स्वरदा साळवी , कु. दिव्यांश कळमकर यांनी स्वीकारली या कार्यक्रमात गावच्या अभंगापासून देशभक्तीपर गीत, नृत्य, भक्तीगीत, कोकणी नृत्य, पोवाडा,चित्रपटगीत अशा विविधांगी मेजवानीने रंगतदार सोहळा पार पडला.