सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
पोंढे(तालुका पुरंदर)येथील आशाबाई राजाराम वाघले(वय ६०)यांचे बुधवार दिनांक १७ रोजी अपघाती निधन झाले.नात्यातील आजारी व्यक्तीला भेटून घरी निघालेल्या आशाबाई वाघले व त्यांचे पती राजाराम वाघले यांना यवत येथील महामार्ग ओलांडताना दुचाकीने धडक दिली.यामध्ये राजाराम वाघले यांना किरकोळ धुकापत झाली.
आशाबाई वाघले यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.सरकारी हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.त्याच्या मागे पती,दोन मुलगे,एक मुलगी,सूना नातवंडे असा परिवार आहे.व्यावसायिक अंकुश वाघले,पुढारीचे नायगाव येथील बातमीदार हनुमंत वाघले यांच्या त्या मातोश्री होत.