सासवड: प्रतिनिधी: बापू मुळीक
पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील श्री कानिफनाथ गडावर १९ ऑगस्ट रोजी गोकुळ अष्टमी निमित्ताने हजारो भाविकांच्या उपस्थितीत दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी कानिफनाथ भक्तांनी गोविंदा रे गोपाळाचा जयघोष केला.
कानिफनाथगडावर आज पहाटे देवांना अभिषेक घालण्यात येवुन महापुजा झाली. त्यानंतर 6.30 वा. पहाटेची नाथांची आरती हे कार्यक्रम झाले. सकाळी बोपगाव येथून निघालेली दिंडींचे कानिफनाथगडावर स्वागत करण्यांत आले. त्यानंतर दु. 12 वाजताची नाथांची आरती होऊन कानिफनाथ मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाच्या कार्यक्रम झाला. गोपगाव 25 येथील भावी भक्तांच्या वतीने भजनाची सुरेल मैफिल संपन्न झाली.
दहीहंडी उत्सवाचे नियोजन यावेळी अध्यक्ष ज्ञानोबा फडतरे, उपाध्यक्ष नामदेव फडतरे, सचिव जयवंत फडतरे, खजिनदार आनंदराव फडतरे, संचालक शिवाजी जगदाळे, प्रकाश का. फडतरे, प्रकाशआप्पा फडतरे, दिपक फडतरे, सुरेश फडतरे, नागेश फडतरे, महादेव फडतरे, नितीन फडतरे, रमेश फडतरे,व्यवस्थापक संतोष गोफणे, पांडुरंग बाठे आदी उपस्थित होते.
बोपगावच्या सरपंच संजीवनी फडतरे, उपसरपंच स्वाती फडतरे, उद्योजक दयानंद फडतरे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे, रायबा जगदाळे ,बबन जगदाळे, बाळासाहेब फडतरे, दिपक फडतरे ,दादा जगदाळे, उत्तम फडतरे, नमन फडतरे, अशोक फडतरे आदींसह बोपगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी १.३० वा. मंदिरात आरती झाली. त्यानंतर छबिना निघाला. 2 वा. देवाचे भक्त सर्जेरावनाना जगदाळे यांनी दहिहंडी फोडली. यानंतर ढोल लेझीमच्या तालावर उपस्थित भाविक भक्तांनी जोरदार पद्धतीने ठेका धरला. सायंकाळी बोपगाव येथून निघालेली दिंडीं कानिफनाथगडावरच्या दहिहंडी कार्यक्रमानंतर पुन्हा बोपगावला परतली. गावात आल्यानंतर येथे गावचा दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला.