सासवड: प्रतिनिधी बापू मुळीक
अवघ्या तीस दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाचे शहरी भागासह ग्रामीण भागातही सर्वांनाच वेध लागले आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सव म्हटला ढोलचा निनाद आपसूक कानावर पडतो. कोरोनाच्या दोन वर्षांच्या अडथळ्यांनंतर यंदा जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. तर दुसरीकडे पुरंदरच्या ग्रामिण भागात पारंपारिक व तंत्रशुद्ध ढोल पथकांची जय्यत तयारी सुरू आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. मात्र आता राज्य सरकारने सर्व निर्बंध उठवल्याने तसेच दोन वर्षे निर्बंध आल्याने या वादकांचाही हिरमोड झाली होती . मात्र आता गणेशोत्सव धुमधडाक्यात पार पडणार असून . अगदी डॉक्टर, उद्योजक शिक्षक, विद्यार्थ्यांपासून ते लहान मुलांचा पथकात सहभाग बघायला मिळत आहे, यंदाचा गणेशोत्सव या वर्षी ते जोरदार तयारीला लागले आहे . दिवसभराची सगळी कामे आवरून संध्याकाळी ढोल ताशाच्या सरावासाठी एखाद्या मोकळ्या मैदानात उतरतात
युवती व महिलांचा वाढता सहभाग
सध्या ढोलपथकामध्ये युवकांपेक्षा युवती व महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातून त्यांच्या वादनाचा छंद पुर्ण होवून शरीराचा चांगला व्यायाम होतो. घरातील कामे आटोपून नित्याने ढोलपथकाच्या सरावासाठी युवती व महिला ऊपस्थित असतात. त्यांना समाजातून मिळणारे प्रोत्साहन प्रेरणादायी आहे.
सर्व वयोगटांचा समावेश
सासवड मधील शिवरुद्र ढोल पथकाचा सराव जोरात सुरु असून यामध्ये वादक संख्या सुमारे ३०० आहे. यामध्ये दहा वर्षापासून मुले मुली ते युवक, युवती, जेष्ठांचासमावेश आहे. पथकात ७१ ढोल २० ताशे, व दोन ध्वज व साहायकांचा समावेश आहे अशी माहिती संग्राम चव्हाण यांनी दिली.ढोल बांधत तर कोणी ताशा, झांज हा उत्साह यंदा पुन्हा सुरु होणार,