रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे व संबंधित ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे पावसाचे पाणी ड्रेनेज लाईन मधून न वाहता रस्त्यावरूनच वाहत असल्याने वाहन चालकांना व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की विविध कंपन्यांमधील व रस्त्यावरुन वाहणारे पाणी ड्रेनेज लाईन द्वारे रांजणगाव येथील तळ्यामध्ये वाहत जाते. मात्र संबंधित ड्रेनेज लाईन औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार असलेल्या राजमुद्रा चौकातच नादुरुस्त असल्याने प्रवाशांना ,वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे . याबाबत याच रस्त्याने औद्योगिक वसाहतीमध्ये ये-जा करणाऱ्या औद्योगिक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दोन-तीन दिवसात काम पूर्ण करून घेऊ असे सांगितले. माञ याआधी गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाची उघडीपी नंतरही याच रस्त्याने वाहणारे पाणी या संबंधित अधिकाऱ्यांना दिसले आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.