सासवडला मध्यरात्रीपर्यंत रंगला `विश्वास दहीहंडी` सोहळा
दहीहंडीचे सुपेच्या रुद्रप्रतापला बक्षिस., लकी ड्राॅच्या 101 पैठणींमुळे महिलांची गर्दी उसळली
सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
सासवड (तालुका पुरंदर) येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर सासवडच्या पालखीतळावर मध्यरात्रीपर्यंत विश्वास दहीहंडी उत्सव समितीचा सोहळा रंगला. खास महिलांसाठी हा दहीहंडी सोहळा लकी ड्राॅ कुपन स्पर्धेतून 101 पैठणी बक्षिसांमुळे लक्षवेधी ठरला. तर कोरोना योद्धा गौरव आणि उल्लेखनिय कामगिरी करणाऱया विविध क्षेत्रातील गुणवंतांना विश्वास कृतज्ञता पुरस्कार देण्याचा सोहळा झाला. उत्सव समितीतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाखाची देणगी देण्याचे यानिमित्ताने समितीचे संस्थापक अध्यक्ष वामन जगताप यांनी सांगितले.
प्रारंभी दहीहंडीचे पुजन सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे ,विद्यमान नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, संदिप वा. जगताप, सुहास लांडगे यांनी केले. ही दहीहंडी सुपे खुर्द (ता.पुरंदर) रुद्रप्रताप गोविंदा पथकाने फोडली आणि बक्षिस 31 हजार रुपयांचे पटकाविले. तर लकी ड्राॅ नगरसेविका रुपाली ठोंबरे, स्नेहल वा. जगताप, वसुधा आनंदे, विमल निगडे, अमृता जगताप, अंजली शेलार, तेजस्वीनी जगताप, योगिता जगताप यांच्या हस्ते हंड्या फोडून काढण्यात आला. तर प्रातिनिधीक कुपन चिठ्ठ्या वीरा जगताप, अन्वी जगताप यांनी काढल्या. पैठणी साडीचे वितरण संत सोपानकाका सह.बँकेच्या संचालीका राजवर्धीनी जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार संजय जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रायोजक योगेंद्र डी.अष्टेकर, युवराज ढमाले, अभिजीत जगताप, निलेश जगताप, दिपक टकले, प्रविण पवार, प्रकाश पवार आदीही उपस्थित होते. तर विश्वास दहीहंडीचे अध्यक्ष शुभम वा. जगताप, प्रतिक शेलार, वैभव जगताप, संतोष खोपडे, मंदार पवार आदी संयोजनात होते.
कोरोना काळात उल्लेखनिय कामगिरी करणाऱया ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धीनी जगताप, डाॅ.सुमित काकडे, निखील भोंगळे, आनंद शिंदे, रोशनी कुंभार आदींचा कोरोना योद्धा म्हणून खास गौरव समितीतर्फे झाला. तर उल्लेखनिय कामगिरी करणाऱया विविध क्षेत्रातील गुणवंतांना विश्वास कृतज्ञता पुरस्कार देण्याचा सोहळा मान्यवरांच्या हस्ते झाला. या पुरस्कारात अॅड.अविनाश भारंबे(ज्येष्ठ विधीज्ञ), अॅड.त्रिगुण गोसावी(सांप्रदायिक), डाॅ.नितीन माने(वैद्यकीय), शिवाजी राजीवडे (शिक्षक सेवा), का.दी. मोरे (बँकींग सेवा), इस्माईल सय्यद (माध्यमिक शिक्षण सेवा), राज मवाळ(नृत्यकला), ओंकार टपळे (सी.ए.यश), सायली जगताप (क्रिडा), गणेश गोरे (महावितरण सेवा), सोमनाथ भोंगळे (रंगावलीकार), मोहन चव्हाण (सार्वजनिक आरोग्य सेवा), अप्पासाहेब पुरंदरे (आदर्श शेतकरी) आदींचा समावेश होता. सूत्रसंचालन मोना करंदीकर यांनी केले., आभार वामन जगताप यांनी मानले,