शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिक्रापूर येथील श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूलमध्ये मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व मेजर ध्यानचंद प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी क्रीडा प्रकाराचे उद्घाटन हे महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष वाव्हळ सर यांनी केले. वाव्हळ सर व पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सूर्यवंशी यांची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष सोमनाथ सायकर, चेअरमन मनीषा सायकर, विश्वस्त बाबुराव साकोरे, अक्षय गायकवाड, प्रशालेचे प्राचार्य गौरव खुटाळ, उपप्राचार्या उज्वला दौंडकर, शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते. बॉक्सिंग व इतर क्रीडा प्रकाराचे नियोजन क्रीडाशिक्षक विशाल गुजर व सर्व अध्यापकानी केले. मैदानावर रस्सीखेच व इतर क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा खेळातील सहभाग उत्साहवर्धक होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता शीलवंत यांनी केले तर बाबुराव साकोरे यांनी आभार मानले.