कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार वाढदिवस विशेष

Bharari News
0

सुनील भंडारे पाटील 

शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार अशोक बाप्पू पवार म्हणजे राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व, समाजकारणाबरोबर राजकारण, समाजसेवा, पक्षनिष्ठ, यामध्ये जबाबदारी पूर्वक काम करण्यामध्ये त्यांचा सहभाग यामुळे त्यांना लोकांनी आपुलकीने " कार्यसम्राट आमदार " ही पदवी बहाल केली, आता त्यांना शिरूर हवेली मतदारसंघ, तसेच पुणे जिल्हा, राज्यामध्ये कार्यसम्राट आमदार या नावाची ओळख जास्त झाली आहे, या नावांमधून आपल्याला त्यांच्या कार्याची प्रचिती येत आहे,

आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी, मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी चांगली करून, प्रत्येक निवडणुकीमध्ये विरोधक कितीही प्रबळ असो त्यांना चारी मुंड्या चित करून, पाणी पाजले आहे ही त्यांची ख्याती आहे, अधिकारातून मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये विविध प्रकारचे निधी देऊन विकास कामे केली, मतदारसंघात असे कुठलेही गाव नाही जिथे आमदार अशोक बापू पवार असा बोर्ड नाही,
घोडगंगा सहकारी साखर कारखाना, व्यंकटेश कृपा सहकारी साखर कारखाना च्या माध्यमातून खूप मोठा दिलासा शेतकऱ्यांना दिला आहे, हजारो एकर ऊस बागायत क्षेत्र या दोन संस्थांवर अवलंबून आहे, शेतीसाठी विविध योजना राबविणे, वेळेत ऊसतोड, वेळेत उसाचे बिल जमा, यामुळे शेतकऱ्यांच्या हृदयात त्यांनी जागा केली आहे,
मतदारसंघात सुमारे 11 कोविड सेंटर खोलून कोविडच्या काळात हजारो लोकांना जीवदान दिले आहे, तसेच कोविड ग्रस्त सिरीयस पेशंट ना नामांकित हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे,
शिरूर-हवेली मतदार संघाचे विद्यमान आमदार अशोक रावसाहेब पवार म्हणजे अत्यंत अभ्यासू, कार्यकुशल, सक्षम आणि नाविन्यपूर्णतेचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्त्व. वडिलांचा समाजकारणाचा लाभलेला सक्षम वारसा पुढे चालवताना अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीने कार्य करणारे आमदार अशोक पवार हे २००९ ते २०१४ पर्यंत शिरूर-हवेली मतदार संघाचे आमदार होते,  
तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये सुमारे ४१,००० मताधिक्याने विजयी होऊन ते शिरूर हवेली मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते स्वतः एक वकील असून त्यांचा कायदे, समाजकारण, राजकारण याचा अत्यंत सखोल अभ्यास आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन असून लोकहितासाठी नाविन्यपूर्ण कार्य करण्यावर त्यांचा भर आहे.
त्यांचे तीर्थरूप रावसाहेब (दादा) पवार यांचा सामाजिक कार्याचा वारसा लाभला आणि त्यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशोक बाप्पु पवार यांनी राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली.
अशोक बापु पवार हे प्रथमतः पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले. पुढे घोडगंगा सहकारी कारखान्यात निवडणुका झाल्यानंतर चेअरमन म्हणून पद प्राप्त झालं. अजितदादा पवार व शरद पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनामुळे व लोकांच्या सहकार्यामुळे राजकारणात मोठे यश मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
घोडगंगा सहकारी साखर कारखाना सर्वांगाने मोठा करण्यासाठी त्यांचे प्रयत्न वादातीत आहेत. सर्वसामान्य राजकारण्यांपेक्षा आगळंवेगळं आणि नाविन्यपूर्ण काम करण्याची त्यांची हातोटी या कालावधीमध्ये महाराष्ट्रभर गाजली.
सरकारी योजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी शरद पवार साहेबांबरोबरीने मोठा संघर्ष त्यांनी पत्करला. इनोव्हेटिव्ह वर्क या संकल्पनेला साकारण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. टू चेंज सिस्टिम ॲंड टू इम्प्रूव्ह सिस्टीम हे त्यांच्या कार्याचे ब्रीद म्हणता येईल.
    शब्दांकन,
    संपादक,
    भरारी न्यूज डॉट कॉम,
    सुनील भंडारे (पाटील),
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!