शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
पिंपळे-हिवरे (ता.शिरुर) येथील स्वातंत्र्य सेनानी स्व.शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालयातील प्रयोगशील शिक्षक कल्याण कडेकर यांना भारत सरकारच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIRF) या संस्थेच्या वतीने सन्मानीत करण्यात आले.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बीण अर्थात जीएमआरटी खोडदच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात परीक्षक म्हणून काम केल्याबद्दल जीएमआरटी खोडदच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात कडेकर यांना वैज्ञानिक तथा केंद्र संचालक डॉ. यशवंत गुप्ता ,डॉ. सोळंकी व डॉ.ओबेरॉय यांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह , दुर्बीण देवून सन्मानित करण्यात आले. देशातील १० राज्यातील सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये ऑनलाईन सहभाग घेतला होता.