शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
पुणे-अहमदनगर महामार्गावर कोंढापुरी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवार (दि.२१ ऑगस्ट) रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली. या अपघातात अनिकेत राम कसबे या १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी बाऴासाहेब हनुमंत उपाडे (वय ३९ वर्षे, खंडोबा माऴी, चाकण, ता. खेड जि. पुणे) यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूरहून कोंढापुरीच्या दिशेने पुणे-अहमदनगर महामार्गावर अनिकेत राम कसबे हा आपल्या प्लॅटिना दुचाकी वरून जात असताना त्याच्या मागुन भरधाव वेगात येत असलेल्या व नगर बाजुकडे जाणा-या अज्ञात वाहनाने कोंढापुरी येथील हाँटेल अर्चना समोर त्याचे मोटारसायकला धडक दिल्याने तो जागीच मयत झाला आहे. शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालादर माने पुढील तपास करत आहेत.