शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रभात फेरी तसेच रक्षाबंधनाचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवानिमित्त गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानिमित्ताने प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याबाबतची घोषवाक्य ही दिली. प्रशालेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी श्रमदानाचा उपक्रमही पार पाडला व त्यानंतर रक्षाबंधनानिमित्त प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींनी त्यांच्या विद्यार्थी बंधूंना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात प्रशालेत साजरा केला.
या उपक्रमाचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनिता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी कौतुक केले,