*स्व.यमुनाबाई नानासाहेब गावडे*
शिरूर तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह.भ. प.सुभाष महाराज गावडे यांच्या मातोश्री स्व.यमुनाबाई नानासाहेब गावडे यांचे दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात चार मुले,सूना,नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे.त्यांची मुले ह.भ.प.सुभाष महाराज गावडे,बाळासाहेब गावडे,सुरेश गावडे, काळूराम गावडे अशी आहेत.आजींनी व स्व.नानासाहेब गावडे यांनी काही वर्षांपूर्वी टाकळी हाजी बस स्टँडला हॉटेल मळगंगा या नावाने छोटासा व्यवसाय चालू केला होता,
तो व्यवसाय आजही तितक्याच दिमाखात चालू आहे.त्यांच्या जाण्याने गावडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.गावच्या जडण घडणीत त्यांच्या कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील,शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराjव गावडे साहेब यांनी शोक व्यक्त केला.