आण्णापुर येथे सापडलेल्या दोन मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन... शोधपत्रिका प्रसिध्द

Bharari News
0
शिरूर विशेष प्रतिनिधी
       शिरूर तालुक्यातील आण्णापुर येथील येवलेमाथा येथे सोमवारी( दिनांक८) रोजी  विहीरीमध्ये अज्ञात २५ ते ३० वर्षाची महिला व १ ते २ वर्षाचे लहान मूल असे दोन मृतदेह आढळून आले आहे. अदयाप या महीलेची व मुलाची ओळख पटलेली नाही. या अज्ञात महीलेचा व मुलाचा खुन की आत्महत्या ? या विषयी तर्कविर्तक लढवले जात असून खरे कारण समजू शकले नाही. या दोघांचे कपडे ऊसाच्या शेतात सापडले आहे. 
याबाबत पोलिसांनी शोध पत्रिका प्रसिध्द केली असून त्यांचे वर्णन खालील प्रमाणे
१) एक अनोळखी महीला वय अंदाजे २५ ते ३० वर्षे नाव व पत्ता माहीत नाही रंगाने सावळी, अंगात गुलाबी रंगाची साडी व लाल रंगाचे डिझाईन असलेले ब्लाउज, काळे केस, कानात सोनेरी धातुचे झुबे, नाकात मुरणी, हातात हिरव्या रंगाच्या बांगडया व मेटलच्या बांगडया, गळयात एक काळया मण्याचे मंगळसूत्र, पायात पैंजण व सोबत एक लहान मुल १ ते २ वर्षे वयोगटातील येणेप्रमाणे वर्णनाची.
२ ) एक अनोळखी लहान मुल वय अंदाजे १ ते २ वर्षे नाव व पत्ता माहीत नाही अंगामध्ये एक पिवळया रंगाचा टि शर्ट त्यावर इंग्रजीमध्ये Tiger असे नाव लिहीलेले व Tiger चे सिम्बॉल असलेले व निळया रंगाची पॅन्ट, हातात काळया धाग्यातील मनी मनगटया असुन चांदी सारखे धातुचे कडे दिसत आहे वयोगटातील येणेप्रमाणे वर्णनाचे.
     तरी याप्रमाणे वरील वर्णनाचे महीला व लहान मुल आपणा कोणाचेही ओळखीचे असल्यास शिरूर पोलिस स्टेशनला खालील नंबरवर फोन करून कळविणेस विनंती करण्यात आली आहे.
शिरूर पोलिस स्टेशन - ०२१३८ २२२१३९
सुरेशकुमार राऊत, पोलिस निरीक्षक ९८२३१०८४५२
अमोल पन्हाळकर, सहा. पोलिस निरीक्षक ८४५९२१००३५
सुनिल उगले, पोलिस उपनिरीक्षक - ९९२२९९९५१३

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!