शिरूर विशेष प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील मलठण येथे बुधवार दिनांक १० ऑगस्ट रोजी गौरव व सौरभ खामकर या बंधूंच्या बालाजी केक शॉप आणि डेअरी उत्पादने या नवीन व्यवसायाचे उद्घाटन पारनेर तालुक्याचे लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या शुभहस्ते पार पडले.
मलठण गावचे सरपंच सिमा कोळपे , माजी सरपंच विलासराव थोरात,माजी चेअरमन नाना फुलसुंदर, उद्योजक मुकुंद नरवडे,शशिकांत वाव्हळ,संदीप गायकवाड, शिवसेना नेते गणेश जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रम आटोपून झाल्यानंतर लोकनेते आमदार निलेश लंके साहेब आणि त्यांचे सहकारी पानोली गावचे सरपंच शिवाजी शिंदे ,ग्रामपंचायत सदस्य नवनाथ खामकर यांनी दत्ता गडदरे यांच्या मंगलमूर्ती अमृततुल्य या नवीन सुरू केलेल्या व्यवसायास सदिच्छा भेट दिली व मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.