कवठे येमाई येथील तरुणांचा प्रामाणिकपणा ... सापडलेले दिड लाखांचे टॅब केले परत

Bharari News
0
शिरूर विशेष प्रतिनिधी
               शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील सचिन लहू वागदरे व प्रशांत विलास वरे हे सोमवारी ( दि. ८) रोजी कामानिमित्त दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने जात असताना पुण्याच्या संगमवाडी जवळ त्यांच्या समोरून चाललेल्या कुरियर गाडीतून एक बॉक्स पडला. त्यांनी दुचाकी थांबवून तो बॉक्स घेवून पुढे गेलेल्या गाडीचा पाठलाग केला, परंतु समोरची गाडी वेगात असल्याने त्यांना गाडी पर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही . 
त्यांनी तो बॉक्स तसाच घरी आणला व त्यावर असलेल्या पत्त्यावरून फोन करून गुजरातच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांना माहिती देवून बॉक्स आमच्या ताब्यात सुरक्षित असून घेऊन जाण्यासंदर्भात कल्पना दिली.   
बुधवारी (दि. १० ) रोजी संबंधित कुरियर कंपनीचे कर्मचारी गणेश पवार,अशोक कदम दुचाकीवरून कवठे येमाई येथे दाखल झाले. येथील ग्रामपंचायत कार्यालयात वागदरे,वरे या दोन प्रामाणिक तरुणाच्या उपस्थितीत १० टॅब त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी v.
       कवठे गावच्या सरपंच मंगलताई रामदास सांडभोर, उपसरपंच विठ्ठल मुंजाळ,निमगाव दुडे चे उपसरपंच संदीप वागदरे व ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी व ग्रामस्थांनी वरे व वागदरे या दोन तरुणांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे अभिनंदन केले. तर हरवलेले १० टॅब परत मिळाल्याने  कुरियरच्या कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करीत त्या तरुणांना बक्षीस देण्याचा प्रयत्न केला पण तो ही त्या दोन तरुणांनी नम्रपणे नाकारला. 
           कवठे येमाई च्या वागदरे व वरे या दोन तरुणांनी दाखवलेला प्रामाणिकपणाचा प्रत्यय इतरांसाठी नक्कीच आदर्शवत व प्रेरणादायी असाच आहे.असे टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामुशेठ घोडे यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!