सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागामध्ये आज गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यानिमित्ताने अनेक विद्यार्थ्यांनी राधाकृष्णचा पोशाख परिधान केला होता. कृष्ण जन्माच्या गाण्यांनी ,विद्यार्थ्यांच्या नृत्याने सभोवतालचा परिसर दुमदुमला होता. यावेळी बाळ गोपाळांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. दहीहंडी फोडून विद्यार्थ्यांना प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप,सचिव संजयजी जगताप,सहसचिव डी. एन. गवळी, विद्यालयाच्या प्राचार्या रेणुका सिंग मर्चंट मॅडम यांनी बाळ गोपाळांचे कौतुक केले .या कार्यक्रमात पूर्व प्राथमिक विभागातील विभाग प्रमुख स्वाती जगताप मॅडम , सर्व शिक्षक , जनसंपर्क अधिकारी श्री अमोल सावंत यांच्याबरोबर शिक्षकेतर कर्मचारी यांचा खूप मोठा सहभाग होता.