लोणी काळभोर अनिकेत मुळीक
तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर लोणी काळभोर येथील डोंगर परिसरात दि.१८ऑगस्ट २०२२ रोजी श्री. अमोलशेठ विलास गाढवे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण प्रसंगी वड,पिंपळ, चिंच, कडुलिंब, जांबुळ, बेल,लक्ष्मीतरू, खैर,उंबर, कंरज अशा ६ फुटी १५१ देशी झाडे लावुण वाढदिवस साजरा करण्यात आला.
या वेळी श्री.ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन पुणेजिल्हा अध्यक्ष . दत्तात्रय शेंडगे, महेश शेठ थोरात, सचिन शेठ गाढवे,. दादा गाढवे,. पांडुरंग राखपसरे, तुषार वाघुळे, शंतनु धुमाळ, साहिल मुलाणी ,तुषार शिंदे , संदिप राखपसरे, कृष्णा राखपसरे , सिद्धार्थ खंडागळे, हुमेसर, नानासाहेब देशमुख, बाबासाहेब घोडके, उपस्थित होते.
वृक्ष हे आपल्या पर्यावरणाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहेत. आपल्या अवतीभोवती असणारी हि झाडे आपल्याला फक्त प्राणवायूच च देता इतर अनेक गोष्टीही देतात.. वृक्षांपासून आपल्याला सावली मिळते थोडक्यात एक प्रकारचा निवाराच मिळतो.वृक्ष एक प्रकारे आपले मित्रच आहेत. अनेक लोकांचा उदरनिर्वाह वृक्षांपासून पूर्ण होतो. म्हणजेच काही लोक झाडांची फळे विकून पैसे कमावतात व आपला उदरनिर्वाह करतात. तसेच आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी झाडे महत्त्वाची ठरतात. झाडांपासून मिळणारा स्वच्छ ऑक्सिजन आणि हवा आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी कारणीभूत ठरते. अनेक वृक्षांमध्ये तर औषधी गुणधर्म असतात त्यापासून विविध औषध बनवली जातात. थोडक्यात झाडांपासून आपल्याला नवीन जीवनदान सुद्धा मिळू शकते असे अमोल शेठ गाढवे यांनी प्रतिपादन केले. तसेच ग्रीन फाऊंडेशन, शंभुराजे प्रतिष्ठान, वनविभाग लोणी काळभोर, वनव्यवस्थापन समिती, शंतनु धुमाळ मित्र परिवार उपस्थित होते.