शेल पिंपळगाव प्रतिनिधी बाप्पू गाडे पाटील
चांडोली (तालुका खेड) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा राजगुरू जयंती भव्य स्वरूपात साजरी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार (दिनांक 24 ऑगस्ट) अभिवादन व तेथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित केला आहे. अशी माहिती अमृत महोत्सवी समितीचे अध्यक्ष अॅड. निलेश आंधळे ,मधुकर गिलबिले, यांनी दिली.
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार ,खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार दिलीपराव मोहिते पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव ,तसेच शहीद राजगुरू ,सुखदेव ,भगतसिंग ,बटुकेश्वर दत्त ,बाबू गेनू, विष्णू गणेश पिंगळे ,यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत. भारतीय अमृत महोत्सव समिती खेड तालुका यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांच्या सहभागातून हा कार्यक्रम होणार आहे, असे एडवोकेट मनीषा पवळे, बाळासाहेब सांडभोर ,विठ्ठल पाचरणे ,आनंदराव गावडे, किशोर कुमठेकर ,पंकज नाईकरे, बाबाजी शिंदे यांनी सांगितले.