सुनील भंडारे पाटील
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेजी यांचा पुणे दौऱ्यावर असताना श्री क्षेत्र वढू बुद्रुकला भरीव निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल वाजेवाडी ग्रामस्थांच्या वतीने शिंदेशाही पगडी आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांना प्रामुख्याने सणसवाडीत-कोरेगाव भीमा आणि लगतच्या गावांच्या औद्योगिक प्रश्नाकडे लक्ष वेधणारे निवेदन देण्यात आले.कोरेगाव भीमा आणि आसपासच्या गावांत असलेल्या गायरान जमिनी या अनेक वर्षांपासून पडून आहेत. त्या जमिनींचा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) माध्यमातून विकास व्हावा आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी त्यांना निवेदन देऊन करण्यात आली.तसेच कोरेगाव भीमा आणि वाजेवाडी चौफुला या दोन्ही ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने भव्य कमान निर्माण करून द्यावी अशीही मागणी त्यांना करण्यात आली.
त्यावेळी वाजेवाडी गावचे सरपंच मोहन वाजे, माऊली भंडारे, शिवाजी भोंडवे, भरत भोंडवे, गोपीचंद भोंडवे, शंकर लोहोट, जगदीश तिखे, गणेश साकोरे, गणेश ढोकले, सुरज बोराटे आणि राहुल सोनवणे उपस्थित होते,खासदार गिरीश बापट साहेब यांचे पीए व वाजेवाडी मांजरेवाडी गावचे उपसरपंच अमित भाऊ सोनवणे यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला,