शिक्रापूर : प्रा. एन.बी. मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत आज मंगळवार (दि. २ ऑगस्ट) रोजी नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रशालेतील विद्यार्थिनींना आपल्या सणांचे व आपल्या संस्कृतीचे ज्ञान व्हावे यासाठी त्यांना नागपंचमीच्या सणाविषयी सखोल अशी माहिती देण्यात आली. तसेच आपले पारंपारिक व लोप पावत चाललेले काही खेळ व फेर मुलींनी धरले. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या फुगड्या खेळण्याचा मनसोक्त आनंद विद्यार्थिनींनी घेतला. यावेळी प्रशालेत
उंच असा झोका बांधण्यात आला होता, तो झोका खेळण्याचा आनंदही प्रशालेतील विद्यार्थिनींनी घेतला.याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे व सर्व शिक्षीकांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
प्रशालीतील या स्तुत्य उपक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी शुभेच्छा दिल्या.