कान्हूर मेसाईच्या विद्याधामचा एन. एम. एम. एस. मध्ये यश . विद्यालयातील १५ विद्यार्थी झाले शिष्यवृत्तीधारक.

Bharari News
0
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
       कान्हूर मेसाईच्या विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने आपल्या यशाची गौरवशाली परंपरा राखत,आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत  घवघवीत यश संपादन केले आहे.विद्यालयातील १५ विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीसाठी झाली असून,त्यांना दरवर्षी १२,००० रुपये शिष्यवृत्ती मिळणार असून,ही शिष्यवृत्ती १२ वीपर्यंत मिळणार आहे.प्रत्येक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याला एकूण ४८,००० रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे.ही माहिती विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी दिली. 
    शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांना प्राप्त गुण खालीलप्रमाणे. ननवरे अथर्व लक्ष्मण (१३०),थोपटे सुजित सहादू(१२६),पिंगळे ईश्वर संजय (१२५),तळोले सार्थक दीपक(१२४),खैरे सार्थक अर्जुन(११७),भोर कुणाल बाळशीराम(११७),पुंडे तनुजा संतोष(११६),नरवडे साक्षी बाळू (११६),बोऱ्हाडे अतिष नितीन (११४),डफळ संकुल धनंजय (११३),सातपुते उत्कर्ष अशोक  (११३),ढगे मयूर सूर्यकांत (१०३),खैरे वैष्णवी सुरेश (१०२),खैरे श्रेयस दत्तात्रय (१०१),गायकवाड प्रणव विनायक (९३).
           यशस्वी विध्यार्थ्यांना वर्गशिक्षक मनोज धुमाळ,प्रा.अविनाश दौंडकर, प्रा.धनंजय तळोले,प्रा.दगडू दंडवते यांनी मार्गदर्शन केले असून,या यशाबद्दल शिक्षण उपायुक्त हरूण आत्तार, संस्थेचे अध्यक्ष गंगाधर पुंडे,सचिव सुदाम तळोले, सरपंच चंद्रभागा खर्डे,विद्या विकास मंडळाचे सर्व संचालक,ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!