शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
येथील सुवर्णा गोरक्षनाथ व्यवहारे (वय ३९ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अतिशय मनमिळावू हसतमुख त्यांचा स्वभाव असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे पती, एक मुलगा, दोन मुली, सासूबाई, दिर, जाऊ, पुतणे असा परिवार आहे. कुरुळी येथील भैरवनाथ विद्यालयातील रावसाहेब व्यवहारे सर यांच्या त्या भावजय तर तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयातील मीनाक्षी व्यवहारे यांच्या त्या जाऊबाई होत.