शिरूर विशेष प्रतिनिधी
नगर व पुणे जिल्ह्यातील नामांकित व आदर्श निघोज नागरी पतसंस्थेचा टाकळी हाजी कार्यालयाचा ४ था वर्धापन दिन गुरुवार दिनांक १८ रोजी टाकळी हाजी कार्यालयात साजरा करण्यात आला.
निघोज नागरी पतसंस्थेने टाकळी हाजी येथे चार वर्षे उत्तमरित्या सेवा पूर्ण केली असुन शाखेचे मॅनेजर चंद्रकांत लंके ,कॅशीअर योगेश घोगरे,क्लार्क अभिषेक रासकर व अभय लामखडे यांचा टाकळी हाजी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. टाकळी हाजी येथील शाखेच्या चार वर्षात १३ कोटी पेक्षा जास्त ठेवी आणि सुमारे पाच कोटी पर्यंत कर्ज वाटप झाले असून प्रत्येक वर्षी ऑडिट वर्ग अ असलेली पतसंस्था भविष्यात उज्वल यश संपादन करेल असा विश्वास शाखेचे मॅनेजर चंद्रकांत लंके यांनी व्यक्त केला.