शिरूर विशेष प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील दानशूर नेतृत्व म्हणून ख्याती असलेले टाकळी हाजीचे आदर्श सरपंच दामूआण्णा घोडे यांच्या सहचारिणी शिरूर पंचायत समिती च्या माजी सदस्या अरुणाताई दामूआण्णा घोडे यांच्या वाढदिवसानिमित्त दामूआण्णा घोडे प्रतिष्ठाण आणि म्हसे ग्रामस्थांच्या सहकार्याने गुरुवार दिनांक १८ रोजी भिल्लवस्ती येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
म्हसे ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य नवनिर्वाचित सदस्य सौरभ पवार,निलेश नरसाळे, जालिंदर मुसळे,जालिंदर खाडे,संभाजी मुसळे, हर्षद पवार , रोहित मुसळे यांनी वृक्षारोपण करून अरुणाताई यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.