टाकळी हाजी सोसायटीचे व्हाईस.चेअरमन रमेश सखाराम गावडे यांना २०२२ आयडीयल फार्मर ॲवॉर्ड

Bharari News
0
शिरूर विशेष प्रतिनिधी 
         टाकळी हाजी येथील सोसायटीचे व्हाईस चेअरमन रमेश सखाराम गावडे यांना संगमनेर येथील वसंत लॉन्स येथे पार पडलेल्या २०२२ आयडीयल फार्मर ॲवॉर्ड ६ वा पुरस्कार सोहळा या कार्यक्रमात "आयडीयल फार्मर ॲवॉर्ड २०२२" हा ॲवॉर्ड प्रदान करण्यात आला.राज्याचे मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते.तारा रमेश गावडे व शुभम रमेश गावडे यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. 
 यावेळी आमदार सुधीर तांबे, अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,पद्मश्री राईबाई पोपेरे,समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ,डॉ.धर्मेंद्रकुमार फाळके, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बाळासाहेब सावंत,पुणे ॲग्री कॉलेजचे डॉ.सुनिल म्हासळकर,आयडीयल फार्मरचे अध्यक्ष प्रकाश अवताडे,उपाध्यक्ष वैभवकुमार जाधव,पुणे जिल्हा एरिया सेल्स मॅनेजर दिपक काळे उपस्थित होते.
        मार्गदर्शक म्हणून टाकळी हाजी येथील रोहन कृषी सेवा केंद्राचे कैलास गावडे यांचे सहकार्य लाभले.एक आदर्श शेतकरी म्हणून रमेश सखाराम गावडे यांचा परिसरात नावलौकिक आहे.शेती करत असताना सामाजिक कार्यात देखील सहभागी असतात.टाकळी हाजी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत व्हाईस चेअरमनपदी विराजमान आहे.
        त्यांच्या या सत्काराबद्दल शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सूनिताताई गावडे, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!