गांजा तस्करी करणारा कुख्यात आरोपी सापडला पोलिसांच्या जाळ्यात (हडपसर)

Bharari News
0
अनिकेत मुळीक लोणी काळभोर
         आज शनिवार  दिनांक - ०६/०८/२०२२ हडपसर, (ता- हवेली) अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा,पुणे शहर दिड वर्षापासुन फरार असलेला पुणे शहरामध्ये मोठया प्रमाणावर गांजाची तस्करी करणारा कुख्यात आरोपी सागर मोहन जाधव जेरबंद केलेची घटना घडली आहे. 
हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं. १३८/२०२१ एन.डी.पि.एस. अॅक्ट कलम ८(क),२०(ब)(ii) (क), २९ या गुन्हयाचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा यांचेकडे होता. सदर तपासा मध्ये आरोपी नावे - अण्णा मोहन जाधव,वय-२६ वर्षे, रा.मु पो कोलवडी,ता.हवेली जि पुणे यास दि. ११/०२/२०२१ रोजी अटक करण्यात आली होती.
    दाखल गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नावे सागर मोहन जाधव रा कोलवडी ता हवेली जि पुणे, हा मुख्यसुत्रधार असुन पुण्यामध्ये मोठया प्रमाणावर तो गांजाची तस्करी करीत असल्याचे व त्याचेवर यापुर्वीसुध्दा गांजा तस्करीबाबतचे गुन्हे दाखल असले बाबत तपासमध्ये निष्पन्न झाले होते त्यामुळे आरोपी सागर मोहन जाधव रा, कोलवडी ता.हवेली जि. पुणे. याचा अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार हे दिड वर्षापासुन शोध घेत असताना तो पोलीसांचे हातावर तुरी देवुन पळुन जात होता.
      आरोपी सागर जाधव याचा अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व अंमलदार हे लोणीकंद पो स्टे चे हद्दीत शोध घेत असताना माहिती मिळाली की गुन्हयातील पाहिजे आरोपी सागर मोहन जाधव हा त्याचे रहाते घरी फ्लॅट नंबर ४०२ मांजरी खुर्द माहेर संस्थेजवळ आवाळवाडी कोलवडी रोड नवदुर्ग रेसीडन्सी पुणे येथे रहात असुन तो त्याचे रहाते घरी किंवा घराजवळ येणार आहे, अशी माहिती मिळाली.
सदर ठिकाणी अंमली विरोधी पथक १ गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन थांबले असताना अंमली पदार्थ रेकॉर्डवरील दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी सागर मोहन जाधव, वय - २७ वर्षे, सध्या रा. केसनंद कोलवडी,गायकवाड वस्ती वाघोली पुणे सध्या रा.फ्लॅट नंबर ४०२ मांजरी खुर्द माहेर संस्थेजवळ आवाळवाडी कोलवडी रोड नवदुर्ग रेसीडन्सी पुणे. हा मिळालेल्या माहितीचे ठिकाणी आला असता त्यास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील अधिकारी व कर्मचारी यांनी शिताफिने ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं. १३८/२०२१ एन.डी.पि.एस. अॅक्ट कलम ८(क),२०(ब)(ii) (क), २९ या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा हे करीत आहेत.
वरील कारवाई ही मा. पोलिस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त  संदिप कर्णिक, मा अपर पोलीस आयुक्त,  रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्रीनिवास घाडगे, मा सहा पो आयुक्त,गुन्हे १ श्री गजानन टोम्पे, यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक,१ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सपोनि लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, योगेश मोहिते, मारुती पारधी, मनोज साळुके, संदिप जाधव, राहुल जोशी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर,सचिन माळवे, रेहना शेख, संदेश काकडे,नितेश जाधव, यांनी केली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!