शिरूर विशेष प्रतिनिधी
शिरुर तालुक्यातील कोंढापुरी या गावात उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि ग्रामपंचायत कोंढापुरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यशवंती महिला ग्रामसंघ कार्यालयाचा उदघाटन कार्यक्रम व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत 15 महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते तिरंगा ध्वज देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषद सदस्या सुजाताभाभी पवार, शिरूर पंचायत समितीच्या सभापती .मोनिकाताई हरगुडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कोंढापुरी गावचे सरपंच .संदीप डोमाळे,उपसरपंच सुजाता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ व यशवंती महिला ग्रामसंघाच्या पदाधिकारी,सदस्या,
तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील तालुका अभियान व्यवस्थापक .शिल्पा ब्राम्हणे मॅडम प्रभाग समन्वयक,पंचक्रोशीतील कार्यरत ग्रामसंघाच्या पदाधिकारी आणि समुह संसाधन व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंती महिला ग्रामसंघाच्या सर्व पदाधिकारी महिलांनी खूप मेहनत घेतली,अशी माहिती तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील तालुका व्यवस्थापक शिल्पा ब्राम्हणे मॅडम यांनी दिली,