टाकळी हाजी येथील दामु आण्णा घोडे यांच्या मळगंगा ग्रामविकास पॅनल चा दणदणीत विजय...

Bharari News
0
शिरूर विशेष प्रतिनिधी
          शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील ४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये दामुशेठ घोडे यांच्या मळगंगा ग्रामविकास पॅनल ने १६-०१ असा दणदणीत विजय संपादन केला आहे.       
 संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मळगंगा परिवर्तन पॅनल तर माजी सरपंच दामुशेठ घोडे,सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे, पुणे जिल्हा परिषदेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पुणे जिल्हा भा. ज. पा. चे उपाध्यक्ष सावित्रा शेठ थोरात, तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येवुन दामु आण्णा घोडे प्रतिष्ठान कडून मळगंगा ग्रामविकास पॅनल ने निवडणूक लढविली. यामध्ये माजी आमदार पोपटराव गावडे यांचा सतरा जागांचा मनसुबा जनतेने उधळून लावत  दामूशेठ घोडे यांना कौल दिला.
    माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला , परंतु  पोपटराव गावडे आणि दामुशेठ घोडे यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्यामुळे समझोता होवू शकला नाही.
       टाकळी हाजी ग्रामपंचायत विभाजन झाल्यामुळे तब्बल अडीच वर्ष प्रशासक नियुक्तीनंतर निवडणूक जाहीर झाली. सहा प्रभाग मधून सतरा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत एकूण  ५५२५ मतदानापैकी ४८९२ मतदारांनी मतदान करून ८९ % मतदान शांततेत पार पडले.
प्रभाग निहाय झालेले मतदान
प्रभागाचे नांव..एकूण मतदान ...झालेले मतदान..टक्केवारी
१) तामखरवाडी--११४४/९७०-- ८४.७९ %
२) गावठाण -----८७२/ ७३८--- ८४.६३ %
३) साबळेवाडी --१०१४/९०९...८९.६४ %
४) होनेवाडी-- १००७/९१६....९१.०६ %
५) शिनगरवाडी --७११/६४४...९०.५७ %
६) डोंगरगण--७७७/७१५...९२.०२ %

विजयी उमेदवार ... दामू आण्णा घोडे प्रतिष्ठान चे मळगंगा ग्रामविकास पॅनल ....
दामू धोंडीबा घोडे,अरुण दामू घोडे,गोविंद सखाराम गावडे, मनीषा विक्रम घोडे,पुष्पा शंकर थोरात, अनिता बाळासाहेब जाधव, पारुबाई सर्जू माळी,अशोक लक्ष्मण गावडे, नानासाहेब अनंथा साबळे,विलास बबन साबळे,प्रियांका म्हतारबा बारहाते,अर्जुन मारुती खामकर, भरत रघुनाथ खामकर,प्रियांका दत्तात्रय दिवेकर,मोहन भाऊ चोरे,प्रमिला सुभाष चोरे
    माजी आमदार पोपटराव गावडे यांचा मळगंगा परिवर्तन पॅनल ... अरुणा दत्तात्रय कांदळकर
     या विजयाबद्दल संपूर्ण तालुक्यातून दामुशेठ घोडे यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!