शिरूर विशेष प्रतिनिधी
टाकळी हाजी (तालुका शिरूर) येथे तालुक्यातील काही प्रमुख येशू ख्रिस्त अनुयायी यांच्यासाठी शांताई उद्योग समूहाचे अध्यक्ष दिलीप शेठ सोदक यांच्या कंपनी मध्ये प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सर्व भक्तांनी आदर्श सरपंच दामु आण्णा घोडे यांच्यासाठी प्रार्थना केली . आणि त्यांच्या राजकीय , सामाजिक कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. दिलीप पास्टर , फुलसिंग पास्टर, प्रशांत पास्टर यांनी प्रार्थना करून नवनिर्वाचित सदस्य आणि आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. दिलीपशेठ सोदक यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करून सन्मान केला.
यावेळी निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे , शिरूर पंचायत समितीच्या माजी सदस्या व नवीन नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या अरुणाताई घोडे, नवनिर्वाचित सदस्य गोविंद गावडे, अशोक गावडे ,विलास साबळे, सुखदेव साबळे सर, अशोक मेचे, पुरुषोत्तम चोरे, भानुदास साबळे, सुरेश मोरे, योगेश चाटे, विठ्ठल कांदळकर, मकरंद साबळे, अरुण ढवळे , युवराज रोहिले आणि ख्रिस्त अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आदर्श सरपंच दामुआण्णा घोडे यांनी सर्व अनुयायींचे आभार मानले व त्यांना शुभेच्छा दिल्या.