शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत भारताचे दिवंगत पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत आयोजीत या कार्यक्रमात प्रशालेतील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख शिवाजी आढाव, विजय राऊत व इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांकडून प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेतील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी सानिया विश्वसे हिने तिच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेस दहा झाडे भेट दिली. याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थिनी अर्पिता थोरात व विराज देशमुख यांनी विद्यार्थ्यांना राजीव गांधी यांच्या बद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे आदींनी शुभेच्छा दिल्या.